Monday Mar 23, 2009

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग पसरली पैंजणे, सैल टाकुनी अंग दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली तबकात राहिले देठ, लवंगा, साली... गदिमा... ग.दि. माडगुळकर म्हणजे साक्षात प्रतिभा. त्यांच्या कविता, गाणी, कथा, गोष्टी, चित्रपट आणि साऱ्यांत कळस असलेलं गीतरामायण... सारं वेड लावणारं.... त्यांचीच ही कविता जोगिया... गणिकेला लग्नाची मागणी घालणारा वेडा प्रेमिक... त्याचं प्रेम न समजल्यानं त्याला नाकारणारी आणि नंतर ती तिथी व्रतस्थ राहून पाळणारी ती गणिका... गदिमांनी अतिशय सुंदर शब्दांत हे नाट्य मांडलं आहे...

Comments (0)

To leave or reply to comments, please download free Podbean or

No Comments

Copyright 2012 Abhijit Thite. All rights reserved.

Podcast Powered By Podbean

Version: 20240320