बडबड...

नमस्कार, मी अभिजित. मला भावलेलं, आवडलेलं आणि इतरांनाही ऐकवावंसं वाटलेलं इतके दिवस मनातच राहात होतं. शक्‍य तेवढ्या मित्रांपर्यंत पोचवत होतो. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवं, म्हणून हा प्रयत्न... बडबड...

Listen on:

  • Podbean App

Episodes

जोगिया

Monday Mar 23, 2009

Monday Mar 23, 2009

कोन्यात झोपली सतार, सरला रंग पसरली पैंजणे, सैल टाकुनी अंग दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली तबकात राहिले देठ, लवंगा, साली...
गदिमा... ग.दि. माडगुळकर म्हणजे साक्षात प्रतिभा. त्यांच्या कविता, गाणी, कथा, गोष्टी, चित्रपट आणि साऱ्यांत कळस असलेलं गीतरामायण... सारं वेड लावणारं.... त्यांचीच ही कविता जोगिया... गणिकेला लग्नाची मागणी घालणारा वेडा प्रेमिक... त्याचं प्रेम न समजल्यानं त्याला नाकारणारी आणि नंतर ती तिथी व्रतस्थ राहून पाळणारी ती गणिका... गदिमांनी अतिशय सुंदर शब्दांत हे नाट्य मांडलं आहे...

म्हैस (Mhais)

Friday Mar 20, 2009

Friday Mar 20, 2009

बडबड सुरू केली खरी... पण सुरवात कुठून करावी, या विचारात होतो... अचानक ट्यूब पेटली. स्वत:चं काहीतरी टाकण्यापेक्षा पु.लं.च्या कथाकथनानं सुरवात केली तर... म्हणून हा पहिला पॉडकास्ट पुलंचा... म्हैस या कथेचा... मला ही कथा प्रचंड आवडते. मी ती कितीदा ऐकली असेल, याला सुमारच नाही. काही गोष्टी कालानुरूप कंटाळवाण्या किंवा रिलेटेड वाटत नाहीत. या कथेचं तसं नाही... मी स्वत: फारसा कोकणात गेलेलो नाही किंवा तिथं एसटीनं प्रवासही केलेला नाही. तरीदेखील ही कथा आपली वाटते, भुरळ घालते...

Copyright 2012 Abhijit Thite. All rights reserved.

Podcast Powered By Podbean

Version: 20240320